Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nanded : भरपावसात डोक्यावर ताडपत्री धरून पार्थिवावर अंत्यसंस्कार

Nanded : भरपावसात डोक्यावर ताडपत्री धरून पार्थिवावर अंत्यसंस्कार
, बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (15:25 IST)
आपला भारत देशाने स्वातंत्र्यता मिळवून 75 वर्षे पूर्ण केली आहे. देश जरी प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असला तरी ही आजही देशातील काही खेडेगाव मागासलेले आहे. त्यांच्या विकास झाला नाही. या गावात वीज नाही , पाणी नाही, रस्ते नाही, मूलभूत सुविधा तर नाहीच.या गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. या ठिकाणी पार्थिवावर भरपावसात ताडपत्री धरून शेतात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दृश्य दिसले.

हे दृश्य आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात भानेगाव तांडा येथील.या गावात दीड  हजार लोकांचे वास्तव्य आहे. हदगाव शहरापासून हे  गाव चार किमी वर आहे. या गावात रस्ते नाही, श्मशान भूमी देखील नाही. या गावातील बळीराम राठोड यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. श्मशानभूमी नसल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी पाऊस सुरु झाला आणि लोकांची धांदल उडाली. 

भर पावसात डोक्यावर ताडपत्री धरून मयत बळीराम राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील लोकांनी प्रशासनाला या गावात काहीही सुविधा नसल्याचे सांगितले होते तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही असा आरोप या गावातील नागरिक करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Varanasi : पाण्यातील करंट पासून मुलाला वृद्धाने वाचवले