Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड: भरदिवसा पतसंस्थेत दरोडा, दोन लाख रुपयांची कॅश लुटली

webdunia
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:21 IST)
नांदेडमध्ये भरदिवसा पतसंस्थेत सहा दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत दरोडा टाकला. तलवार आणि चॉपर घेऊन तोंडाला फडका बांधलेले सहा दरोडेखोर पतसंस्थेत शिरले. त्यांनी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना तलावारीने धमकावत पतसंस्थेतील दोन लाख रुपयांची कॅश लुटली.
 
कॅश  लुटून हे सहाही दरोडेखोर दुचाकीवरुन पळून जात होते. पण पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी आरडा ओरडा केल्याने आजूबाजूची लोकं धावून आले. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करत एकाला पकडलं. तर इतर पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील सिंधी इथं ही घटना घडली.
 
दरम्यान दरोड्याचा हा सगळा प्रकार पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

Edited - Ratandeep Ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिलिंद नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणतात ...