Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nandurbar : नदी नाल्यातून दोरीच्या साहाय्याने अंत्ययात्रा नेली

fueral
, रविवार, 10 सप्टेंबर 2023 (15:27 IST)
आपला देश जरी प्रगती करत आहे तरी ही आज देखील काही गावातील दशा दयनीय आहे. काही गावात रस्ते देखील नाही. या गावातील लोकांना फार कष्ट सोसावे लागत आहे.   असं म्हणतात की मेल्यावर सर्व यातनेतून मुक्ती मिळते पण कधी कधी मेल्यावर देखील कष्ट भोगावे लागते. ग्रामस्थांना शेवटचा अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून दोरीच्या साहाय्याने अंत्ययात्रा घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात घडत आहे. 
 
सध्या राज्यातील काही भागात पावसाने पुन्हा परती केली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात वागदे गावात  गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. या गावातील धावजी उखाराव नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाऊसामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता आले नाही.

अखेर 15 तासानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.या वागदे गावात रस्ते नाही आणि नदी ओलांडण्यासाठी पूल देखील नाही. स्मशान भूमी गावाच्या नदीच्या पलीकडे आहे. स्मशानभूमी जाण्यासाठी नाला ओलांडून जावे लागते. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे त्या मुळे नदी नाल्यात पाणी वाढले आहे.पुराची स्थिती आहे. 

अशा परिस्थितीत गावातील धावजी नाईक यांचे 8 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा चक्क 4 फूट खोल नाल्यातून दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून स्मशान भूमीत जावे लागले. धावजी नाईक यांचावर 15 तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने गावाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तलाठी भरती घोटाळा! घोटाळ्यात महिला कर्मचाऱ्याचा समावेश , महिलेला अटक