Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उर्दू शायर, कवी आणि गीतकार नक्श लायलपूरी यांचे निधन

उर्दू शायर, कवी आणि गीतकार नक्श लायलपूरी यांचे निधन
उर्दू शायर, कवी आणि गीतकार नक्श लायलपूरी (८९ ) यांचे निधन झाले. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अंधेरीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतामधील गावात नक्श लायलपूरी यांचा जन्म झाला होता. लायलपूरी यांचे मूळ नाव जसवंत राय शर्मा असे होते. १९४० च्या दशकात नक्श लायलपूरी हे हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईत आले. १९५२ मध्ये त्यांना पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे ते गीतकार होते. मात्र तब्बल १८ वर्षांनी लायलपूरी यांना प्रसिद्धी मिळू लागली.

मुंबईत आल्यावर लायलपूरी यांना खडतर प्रसंगांचा सामना करावा लागला. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी काही दिवस डाक विभागातही काम केले. हिंदी सिनेसृष्टीतील त्यावेळचे आघाडीचे दिग्दर्शक, संगीतकार आणि गायकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. रॉमेंटिक आणि भावूक गाण्यांनी लायलपूरी यांनी संगीतप्रेमींची दाद मिळवली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किमान ५ टक्के जागा जिंका, मिळवा एकच चिन्ह