Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युती तोडणे ही शिवसेनेची कमजोरी

युती तोडणे ही शिवसेनेची कमजोरी
मुंबई , शनिवार, 28 जानेवारी 2017 (11:38 IST)
युती तोडणे ही शिवसेनेची कमजोरी आहे. पक्षात बंडखोरी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. युती होणार नाही हे मी आधीच सांगितले होते आणि ते झाले अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला. राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढरार असल्याजी गर्जना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केली. याबाबत बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर बोचरा वार केला. युती तोडूनही शिवसेना सत्तेत आहे. सत्तेसाठी शिवसेना लाचार आहे. सत्तेतील युती तोडण्याची धमक उद्धव ठाकरेंमध्ये नाही, अशी जळजळीत टीका राणे यांनी केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बँकेतून काढा पुढील महिन्यापासून कितीही पैसे