Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘त्याने’ हाताने नाही तर पायाने केले मतदान

‘त्याने’ हाताने नाही तर पायाने केले मतदान
, मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (07:57 IST)
नाशिक शहरालगत असलेल्या देवळाली मतदार संघात एका शेतकऱ्याने दोन्ही हात नसतानाही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याचं नाव बाजीराव मोजाड असे आहे. यावेळी बाजीराव यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांना दोन्ही हात नसल्यामुळे त्यांच्या पायावरील बोटावर शाई लावण्यात आली.
 
मोजाड हे शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यामुळे शेतीच्या जोडीला ते अनेक कामे करतात. २००८ मध्ये गहु कापणीच्या मशिनवर काम करताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांचे दोन्ही हात गेले. हात गमावल्यानंतर त्यांनी मतदान केले नव्हते. यंदा मात्र ते गावातील हायस्कूलमध्ये ते दुपारी मतदानासाठी गेले. त्यावेळी हात नसल्याने मतदान कसे करणार असा प्रश्न मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना विचारला. मदतनीस देऊ केला. परंतु मोजाड यांनी हाताने नाही तर पायाने मतदान केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करा शॉपिंग, Diwali with Mi सेलचं आयोजन