Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 March 2025
webdunia

मोहीम: हेल्मेट घातले नाहीतर भविष्य पहा

मोहीम: हेल्मेट घातले नाहीतर भविष्य पहा
नाशिकमध्ये शहर वाहतूक पोलिसांकडून २८ व्या राष्ट्रीय सुरक्षा साप्ताह अंतर्गतअनेक नाविन्यपूर्ण जनजागृती करण्याचे उपक्रम घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसापासून १४००हून अधिक दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्याचे फायदे या विषयावर निबंध लिहिला. आता मात्र पोलिसांनी नवीन शक्कल लढवत हेल्मेट वापरणे टाळणाऱ्यांची थेट भविष्यवाणी बघण्यासाठी गुरुजींना आमंत्रण दिले असून येथे हेल्मेट न वापरणार्यांचे मोफत भविष्य बघितले जाईल असे फलकही लावण्यात आले आहेत.एबीबी सर्कल जवळ हा उपक्रम घेण्यात येत असून तेथे ठेवलेल्या टेबल्सवर चिठ्ठ्या ठेवलेल्या दिसून येत आहेत. त्यातली कोणताही एक चिठ्ठी उचलून भविष्य सांगण्यात येत असून हेल्मेट न घातल्यामुळे होणारे तोटे यातून विषद करण्यात आले आहेत. काही चीठ्ठ्यांमधील भविष्य असे…
 
आपला अपघात होऊन आपल्या डोक्याला इजा होण्याचा भोग आहे.
आपल्या विम्याच्या रकमेमुळे आपले कुटुंबीय धनाढ्य बनविण्याचा योग आहे.
आपला अपघाताशी सामना झाल्यास गंभीर जखमी होऊन आपल्या चिमुकल्याच्या स्वप्नपुर्तीमध्ये अडथळे होणार आहेत.
अशा पद्धतीने दुचाकीस्वारांचे प्रबोधन करण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाडला