Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: पतीने भिशीसाठी पत्नीकडे मागितले पैसे पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य…

crime
, मंगळवार, 24 मे 2022 (08:43 IST)
पतीने भिशीसाठी पत्नीकडे मागितले होते पैसे मात्र त्यानंतर पत्नीने पतीसोबत जे कृत्य केलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. पैशांच्या कारणावरुन झालेल्या वादातून पत्नीने फेट्याच्या कापडाने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे, या प्रकारानंतर पत्नीने पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला.

मात्र, पोलिसांच्या कसून केलेल्या चौकशीत अखेर सत्य उघडकीस आले आहे.याप्रकरणी वनिता सिताराम गायकर (मुसळगाव, ता. सिन्नर) या महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम लक्ष्मण गायकर (वय ४२) मु. आहुर्ली पो. साजेगाव ता. इगतपुरी येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुसळगाव हायस्कूल येथे राहत होते. त्यांची पत्नी वनिता हिच्यासोबत त्यांचे काही ना काही कारणावरुन वाद होत असे.

दोन दिवसांपूर्वी सिताराम आणि वनिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भिशीचे पैसे भरण्यासाठी पोस्टाचे पैसे द्यावे, अशी मागणी सितारामने केली. याचा राग वनिताला आला. त्यामुळे तिने संतापाच्या भरात फेट्याच्या कापडाने पती सिताराम याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने पोलिसांना सांगितले की, पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना संशय आला.
 
त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. अखेर वनिताने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार, पत्नी वनिता विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर के त्रिभुवन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक हे पुढील तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यावर गुन्हे दाखल करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू