Publish Date: Fri, 28 Oct 2016 (10:45 IST)
Updated Date: Fri, 28 Oct 2016 (10:46 IST)
यात नाशिक शहरालगत असलेल्या वडांगळी गावात एका आईने आपल्या बाळाला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढत वाचवले आहे. आईने दाखवलेल्या धाडसामुळे त्यांच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.
ही गोष्ट आहे बुधवारी संध्याकाळची. यात वैभव आपल्या आईसोबत शेतात काम करत होता. मक्याचे कणसे मोडत वैभवची आई थोडी पुढे गेली आणि अचानक वैभवच्या जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. ती धावत पळत गेली. बघते तो काय, वैभव चक्क बिबट्याच्या जबड्यात होता. बिबट्या त्याला घेउन पसार होण्याच्या तयारीत होता. हे बघताच वैभवची आई धावत ओरडतच बिबट्याच्या दिशेने पळाली. आईला धावतांना येतांना पाहून बिबट्या वैभवला टाकून पळाला.