Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : काय आहे नाराजीबाबतच्या चर्चेला अजित पवार यांचे उत्तर

ajit pawar
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (20:34 IST)
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गणशोत्सवामध्ये वेगवेगळ्या दिग्गजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगला वर्षा निवासस्थानी हजेरी लावली. पण, संपूर्ण गणेशोत्सवात अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर गेले नाहीत. तसेच, 3 ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाही अजित पवार यांनी हजेरी लावली नव्हती.  पण, या चर्चांवर अजित पवार यांनी मौन सोडलं आहे. ते नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अजित पवार म्हणाले, “मी नाराज असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गेलो नाही, अशा बातम्या चालवण्यात आल्या. अरे बाबा तब्येत ठिक नव्हती, कुठं मंत्रिमंडळ बैठकीला जाता.”
 
“ओबीसी बैठकीतही माझ्यात आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली, अशा बातम्या चालवल्या. आरे कशाची खडाजंगी… ही बातम्या आल्यानंतर मी भुजबळांना फोन केला आणि विचारलं, ‘कधी आपल्यात खडाजंगी झाली?’… म्हणजे काहीही चालू आहे. पण, लोकांना बातम्या वाचून खरे वाटते. हे तीन पक्षांचं सरकार आहे. घर चालवत असताना कारभाऱ्याला अडचणी येत असतात. येथे वेगवेगळ्या विचारधारा आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असल्याने आम्ही एकत्र आलो आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.














Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळांनी दिला सल्ला