Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: दहा लाखांची खंडणी घेणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यास अटक

नाशिक: दहा लाखांची खंडणी घेणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यास अटक
, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (08:29 IST)
नाशिक :- आक्षेपार्य व्हिडिओ असल्याचा दावा करून कृषी अधिकारी असलेल्या महिला व तिच्या मुलाने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या गंगापूर रोड येथील विश्वस्ताकडुन दहा लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 
याबाबत सविस्तर माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या नाशिक येथील गंगापूर रोड वर असलेला केंद्रामध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले निंबा मोतीराम शिरसाट यांच्याकडे 2014 पासुन याच केंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सारिका बाबुराव सोनवणे या कृषी अधिकारी पदावर काम करणाऱ्या महिलेची ओळख झाली. या महिलेचे पती बापुराव सोनवणे यांचे सन 18-19 ला निधन झालेले आहे आणि सारिका बापुराव सोनवणे या आपल्या मुलासह या केंद्राच्या जवळच असणा-या सोसायटीमध्ये राहतात.
 
त्यांनी सातत्याने निंबा मोतीराम शिरसाट यांच्याशी असलेला ओळखीचा फायदा घेऊन प्रथमदर्शनी हात उसने पैसे मागितले त्यानंतर माझ्याकडे आक्षेपार्य व्हिडिओ आहे, अशी धमकी देऊन सातत्याने सारिका बापूराव सोनवणे यांनी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संकल्प सिद्धी नावाची कंपनी पैसे डबल करून देते असे आम्हीच दाखवून पैसे उकळायला सुरुवात केली.
 
त्यानंतर जानेवारी 2023 पासून सोनवणे यांनी निंबा शिरसाठ यांच्याकडे व्हिडिओ चे नाव सांगून सातत्याने खंडणी मागितली आतापर्यंत शिरसाठ यांनी सारिका सोनवणे यांना सुमारे एक कोटी पाच लाख रुपये इतकी खंडणी दिली असून या प्रकरणाला सातत्याने वैतागून शिरसाठ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली.
 
पुढे माहिती देताना पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितले की, काल पुन्हा सारिका सोनवणे यांनी शिरसाट यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती आणि ती रक्कम स्वीकारताना जेहान सर्कल येथे सारिका सोनवणे आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
पोलिसांनी या महिलेचे लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले असून ज्या व्हिडिओच्या आधारे त्रास दिला जात होता त्याची सत्यता देखील तपासली जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.
 
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली होती धमकी
जानेवारी 2023 मध्ये आरोपींनी शिरसाट यांना मोबाइल मधील व्हिडिओ दाखवून 20 कोटी रुपयांची मागणी केली. अन्यथा त्यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तिला घाबरून शिरसाट यांनी उसनवारीने जमवून ५० लाख रुपये सोनवणेला दिले. तरी पुन्हा तिने 10 कोटी 50 लाख रुपये मागून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात तब्बल 29 लाख कुणबी मराठा नोंदी, विदर्भात सर्वाधिक तर मराठवाड्यात..