चांदवड – एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसद व महाराष्ट्र शासन- नाशिक विभागीय आयुक्त विद्यमाने आयोजित चांदवड तालुका सरपंच परिषद चांदवड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली.या सरपंच परिषदेस चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. या परिषदेत सरपंचांनी सादर केलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण करत प्रशासकीय अधिका-यांनी संवाद साधला. सरपंचांना संवादाच्या माध्यमातून ग्रामविकास उपयोगी ठरणारे व्यासपीठ सरपंच संसदेने उपलब्ध करून दिले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे चांदवड- देवळा प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी सांगीतले.नाशिक प्रशासकीय विभागात असणा:या एकूण पाच जिल्हयातील 54तालुक्यात सरपंच संसद उपक्रमाचे तालुकानिहाय आयोजन करण्यात येत आहे.
पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांची संकल्पना असून नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे प्रमुख मार्गदर्शक आहेत. ग्रामीण भागातील विविध प्रश्नाच्या निराकरणासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. चांदवड तालुका- सरपंच संसदेत चांदवड- देवळा प्रांत चंद्रशेखर देशमुख, चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले. एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी उपक्रम संकल्पना विशद केली. समन्वयक प्रकाशराव महाले यांनी प्रास्ताविक केले. चांदवड तालुका समन्वयक विजय जाधव यांनी स्वागत केले.
नाशिक विभाग समन्वयक संजय भवर यांनी सूत्रसंचालन केले. मार्गदर्शक व दरसवाडीचे सरपंच आर.डी.थोरात गांधी प्रातिनिधीक स्वरूपात चांदवड तालुक्यातील सर्वा ग्रामवासी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. गणसमन्वयक व कानमंडाळेचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प संजय महाराज शिंदे यांनी या संसदेचा समारोप केला.