अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत अमरावतीतील एका मुलीला तिच्या पती ने डांबून ठेवण्याची तक्रार केल्याची चौकशी करण्यासाठी राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांना विचारपूस केली असता त्यांनी आपला फोन कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यावरून पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे.
प्रकरण असे आहे की, सध्या अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रमाण वाढले असल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आंतरधर्मीय लग्न झालेल्या एका मुलीला तिच्या पतीने डाम्बवून ठेवले या प्रकरणी संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असून मुलगी अद्याप बेपत्ता आहे. मुलीचा शोध लावायला आणि या प्रकरणाची चौकशी करायला एवढा वेळ का लागत आहे ? असा प्रश्न पोलिसांना नवनीत राणा यांनी केला असून मुलीच्या कुटुंबीयांनी माझ्या कडे या प्रकरणाची तक्रार केली. या बाबत मी पोलिसांना फोन केला असता माझा फोन कॉल रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन तुम्हाला माझे फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार कोणी दिले? असे प्रश्न पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. या वेळीत्या पोलिसांशी जोर जोरात बोलत होत्या आणि आक्रमक झाल्या होत्या. त्याआक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.