Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा करणार नायनाट, गडचिरोलीत गृह मंत्रालयाची बैठक

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा करणार नायनाट, गडचिरोलीत गृह मंत्रालयाची  बैठक
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (08:16 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य ठेवले.
 
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य निश्चित केले. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहे. तसेच गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भाग आणि छत्तीसगडच्या नारायणपूर आणि विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात येत आहे.
 
आता स्पेशल ऑपरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गडचिरोलीतील अवघड भागात नक्षलवाद्यांना नायनाट करण्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उच्च अधिकारी, महाराष्ट्राचे डीजी रश्मी शुक्ला, डीजी सीआरपीएफ अनिश दयाल सिंग, आयजी नक्षलविरोधी ऑपरेशन संदीप पाटील, छत्तीसगडचे उच्च पोलीस अधिकारी, गडचिरोलीचे एसपी आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांचे एसपीही गडचिरोली उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला अटक, तिने याचे कारण सांगितले