येत्या १ ते ११ डिसेंबर दरम्यान यवतमाळ ते नागपूरपर्यंत या नाकर्त्या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'हल्लाबोल' पदयात्रा काढण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवशी, १२ डिसेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे जाहीर सभा घेण्यात येईल. वाढदिवसापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे. आज मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची या आंदोलनाच्या नियोजनासंबंधी बैठक झाली, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली.
या आंदोलनाआधी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी कराड येथेही एक व्यापक आंदोलन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawar यांच्या नेतृत्वात होईल. २५ ते ३० तारखेपर्यंत राज्यातील इतर भागात कार्यकर्त्यांनी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित करत या सरकारविरोधात आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या वतीने केले आहे.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील , विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , ज्येष्ठ नेते गणेश नाईक , कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले , मुख्य प्रवक्ते नवाब मलिक , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोटे , आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..