सध्या कोरोनाने पुन्हा डोकं काढले आहे. देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहे. राज्यात देखील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य विभाग सध्या चिंतेत आहे. नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे.सामान्य नागरिक बडे बडे नेता, अभिनेता आता कोरोनाच्या विळख्यात पुन्हा अडकत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले असून त्यांना कोरोनाची लागण लागली आहे. काल त्यांना ताप आल्यावर त्यांनी कोरोनाची चाचणी केली त्यात ते पॉझिटिव्ह आले .संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिवेशनानंतर ते आजारी पडले होते.