भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त होतं. मात्र, मंगळवारी संध्याकाळी हा अहवाल सापडला देखील. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, सेनेचा हात असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला.
झोटिंग समितीचा अहवाल गहाळ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे खडसेंना क्लीनचिट नाही आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की यामध्ये घोटाळा झाला आहे. त्यामुळे ईडीची चौकशी शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्याचं षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने रचलं होतं. हा अहवाल लवकरात लवकर खुला करुन जनतेसमोर मांडावा, भाजपची मागणी आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.