rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाचशे रुपयांचा नव्या 50 लाख नोटा आल्या

new 500 rs. note
नाशिक , सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (11:33 IST)
500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्याने गेले 5 दिवस नागरिक बॅंक आणि एटीएम बाहेर रांगेत उभे राहून त्रस्त होत आहेत. नाशिक येथील प्रतिभूती मुद्रणालयाकडून दिलासा देणारी बातमी आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार नाशिक प्रेसने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला 500 रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली आहे. शनिवारी रात्री उशिरा नाशिक प्रेसने 500 रूपयांच्या 50 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला पाठवल्या आहेत.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचशे रूपयांच्या नोटांच्या या पहिल्या खेपेनंतर बुधवारी अजून 500 रूपयांच्या 50 लाख नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला नाशिक प्रेसकडून पाठवण्यात येणार आहेत. याबरोबरच, नाशिक प्रेसकडून 20,50 आणि 100 रूपयांच्या नोटा छापण्याची संख्या वाढवण्यात आली आहे. देशात असणाऱ्या नऊ नोट छापण्याच्या कारखान्यापैकी नाशिक येथिल एक कारखाना आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली