rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई कपडा व्यापारीकडे आढळले २३ लाख नवीन नोटा

new note
, मंगळवार, 13 डिसेंबर 2016 (17:12 IST)
सामन्य माणूस रांगेत उभे राहून २००० रु काढत आहे.मात्र काही लोकांना मागच्या दाराने सर्रास पणे नोटा बदलून मिळत आहे. असाच प्रकार मुंबई येथे घडला आहे.
 
पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून  कोपरखैरणे येथे 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त केली आहे. हे सर्व पैसे रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे. कोपरखैरणेमधून बेवर्ली पार्क सेक्टर 14 मध्ये राहणाऱ्या हंसराज अहीर आणि रमेश गोहिल या दोन व्यापाऱ्यांकडून ही रोकड जप्त करण्यात आलीआहे. दोघांनी एवढी मोठी रक्कम कुठून आली? याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, इनकम टॅक्स विभागाला या संदर्भात कळवण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात 33 लाखाच्या नवीन नोटा जप्त, पाच जणांना अटक