Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओमिक्रॉनची प्रकरणे वाढल्यानंतर महाराष्ट्रात नवीन निर्बंध लादणार? ठाकरे यांची टास्क फोर्स सह बैठक

ओमिक्रॉनची प्रकरणे वाढल्यानंतर महाराष्ट्रात नवीन निर्बंध लादणार? ठाकरे यांची  टास्क फोर्स सह बैठक
, सोमवार, 6 डिसेंबर 2021 (17:44 IST)
महाराष्ट्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची संख्या वाढू लागली आहे. हे पाहता, राज्यात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत कडकपणा वाढणार आहे, असे दिसते? आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्स सह बैठक असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या Omicron ची वाढती प्रकरणे पाहता, राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी लोकांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि लसीकरण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ओमिक्रॉनच्या वाढत्या चिंतेमध्ये कोविड-19 निर्बंधांवर चर्चा करण्यासाठी राज्य टास्क फोर्स आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार. 
आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही केवळ विमानतळांवर, प्रवेशावरच नव्हे तर शहरांमध्येही मोठ्या संख्येने कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी घेत आहोत. कॉर्पोरेट कार्यालयांनी दर आठवड्याला RT-PCR चाचण्या घेतल्या पाहिजेत. यासोबतच सरकार आणखी निर्बंध लादण्यासंदर्भात पुढील दोन ते तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करेल, असेही ते म्हणाले.
आदित्य पुढे म्हणाले की, ज्यांनी कोविड-19 ची लसीकरण केलेली नाही, त्यांनी  लसीकरण करावे. ते म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, परंतु जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा काळजी घ्यायची असते.आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याबाबत आदित्य म्हणाले की, राज्य सरकारने आपले नियम कडक केले आहेत आणि अतिरिक्त निर्बंध लादले आहेत, जे वेळोवेळी लागू केले गेले आहेत. त्यावर वेळोवेळी पुनरावलोकन केले जाईल.महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची एकूण संख्या 14 झाली आहे. राज्यातील पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 6 जणांना या प्रकाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यापूर्वी, भारतीय वंशाची 44 वर्षीय नायजेरियन महिला, तिच्या 18 आणि 12 वर्षांच्या दोन मुली 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियाहून पिंपरी चिंचवड येथे तिच्या भावाला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्या सर्वांना ओमिक्रोनची लागण झाली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी ! राज्य सरकारला मोठा धक्का ,OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टा कडून स्थगिती