rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

३१ Dec साठी हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

new year
, शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:11 IST)
नविन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी  राज्याच्या पोलिस महासंचालकांनी बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने पोलिस प्रशासनाला हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान सेलिब्रेशनमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित बार किंवा हॉटेल चालकावर असेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय ध्वनी प्रदषणाच्या नियमांचं पालन करण्याचे आदेशही ऑर्केस्ट्रा चालकांना दिले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राबाहेर आज रात्री साडे 11 ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर या परिक्षेत्रासाठी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव स्वगृही