पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाला जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे नाव देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रोटरी व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. प्रकल्प चालू करण्यापूर्वी प्रकल्पास नाव देण्याच्या दृष्टीने फ प्रभाग समितीने 4 जून 2018 रोजी या उड्डाणपुलाचे नाव जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती-शक्ती) देण्याचा ठराव मंजुर केला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील प्रकल्पांना नाव देण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आहे.