Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

निलंगा : औराद शहाजानीत ४२ अंश सेल्सिअस तापमान

In Aurad Shahajani area of Nilanga taluka
, बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:07 IST)
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात थंडीच्या काळात उच्चांकी गारठ्याची नोंद होते आणि उन्हाळ््यात उन्हाची तीव्रता वाढते. उन्हाची तीव्रता वाढत असताना आज प्रथमच औराद परिसरात ४२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे औराद परिसर तापला असून, गर्मीने नागरिक हैराण झाले आहेत. भर दुपारी रस्ते ओस पडू लागले असून, उन्हाच्या वेळी नागरिक शीतपेय केंद्राकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
 
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढल्याने थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी असते व गर्मीच्या दिवसांत तापमानात वाढ होते. त्यातच गत ३ दिवसांपासून औराद शहाजानीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना गर्मीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यात वयोवृद्ध व लहान मुलांना अधिक झळा सोसाव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यातून सुटका मिळावी, यासाठी नागरिक दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत.
 
तीन दिवसांपासून तापमान वाढ
गेल्या ३ दिवसांपासून औरादच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात ३१ डिसेंबर रोजी कमाल ४०.०५ तर किमान २६ अंश सेल्सिअस, १ एप्रिल रोजी कमाल ४१ अंश सेल्सिअस व किमान २६ .०५ आणि २ एप्रिल रोजी कमाल ४२ अंश सेल्सिअस व किमान २७.०५ अंश सेल्सिअस झाले असल्याचे औराद येथील हवामान केंद्राचे मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिक डोक्यावर टोप्या, गमच्या, छत्री आदींचा वापर करीत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यवतमाळ-वाशिम : अर्ज भरण्याची वेळ निघून चालली, तरी महायुतीचा उमेदवार ठरेना