“संज्याला प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”

गुरूवार, 26 मार्च 2020 (11:01 IST)
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत सर्व जण घरात कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि आपआपले छंद जोपासत आहे. 
 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील हार्मोनिअम वाजत आपल्या छंदासाठी वेळ काढला आणि याच क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली.”
 

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली. pic.twitter.com/MTNkZ3uKnh

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 25, 2020
यापूर्वीही अनेकदा निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज