Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्प, बोगदा कोसळला, ७ ठार

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्प
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भिगवण जवळील अकोले गावात नीरा भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्याचे बांधकाम सुरु होते. 
 
येथे १५० मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत असून या बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटली. त्यामुळे अपूर्णावस्थेत असणारे येथील बांधकाम कोसळले.  अग्निशामन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या प्रस्तावित कामासाठी तीनशे कामगार काम करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगात विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये भारत तिसरा