Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

नितीन आगे खून खटला : पुन्हा न्यायालयात सुरु होणार

nitin aage murder
, बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:00 IST)

पूर्ण राज्याला नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता. उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फिरवल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, नव्याने तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालविला जावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सोमवारी (11 डिसेंबर) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शासन अपील करणार असून जनहित याचिकेमधील सर्व मागण्या यात आहेत, हे सरकारी वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली आहे. राज्य शासनाचे या प्रकरणातील अपील तयार असून ते दाखल लवकरच खंडपीठात दाखल होणार आहे.पुन्हा खटला सुरु करावा आणि फितूर झालेल्या साक्षीदारांवर  केसेस दाखल कराव्यात असे कोर्टाने सांगितले आहे. 

 

  •  जनहित याचिका सोमवारी (11 डिसेंबर) उच्च न्यायालयात दाखल
  • सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी, अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका 
  • उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या
  • सरकारी वकील, साक्षीदारांना संरक्षण द्यावे,
  • नितीन ज्या कॉलेजमध्ये शिकत होता, त्या कॉलेज ट्रस्टींना, मुख्याध्यापकांना सहआरोपी करावे
  • कोर्टाचे आदेश 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला बाळाला जन्म