Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोणावळा : वॅक्स म्युझियममध्ये गडकरींचा पुतळा

nitin gadkari
, रविवार, 28 मे 2017 (20:52 IST)
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळाही ठेवण्यात येणार आहे. हा पुतळा सध्या नागपुरातील गडकरी वाड्यात ठेवण्यात आला आहे. आता वॅक्स स्टॅच्युच्या सेलेब्रिटी रांगेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही बसणार आहेत. सुनील कुडालू यांनी या गडकरींच्या पुतळ्याची निर्मिती केली आहे. सुनील कुडालू यांनी बनवलेल्या गडकारींच्या वॅक्स स्टॅच्युचं अनावरण स्वत: नितीन गडकरींच्याच हस्ते करण्यात आलं. अगदी गडकरी यांचे स्मित, तीच बसण्याची पद्धत… नागपुरातील गडकरी वाड्यात गडकरींचा वॅक्स स्टॅच्यु पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती. गडकरींचा पुतळा एवढा हुबेहूब आहे की, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या पुतळ्यालाच शुभेच्छा दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीर : मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बंद