Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

महाराष्ट्रात कुठेही लोडशेडिंग नाही, उर्जा मंत्र्याचा दावा

nitin raut
, बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:30 IST)
राज्यात मोठ्या प्रमाणात कोळशाची टंचाई आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने विजेची तूटही निर्माण झाली आहे. केवळ आपल्याकडेच नाही, तर देशातील 12 राज्यांमध्ये विजेची टंचाई आहे. अशा परिस्थितीत देखील मागील 5 दिवसांमध्ये आम्ही महाराष्ट्रात कुठेही लोडशेडिंग होऊ दिलेले नाही. पुढच्या काळातही राज्यातील जनतेला वीज कमी पडू देणार नाही, त्यामुळे जनतेने चिंतामुक्त रहावे, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला.
 
राज्यातील वीजटंचाई, लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, सध्याच्या घडीला राज्यात 15 टक्क्यांच्या आसपास विजेची तूट आहे. आम्ही साडेसात हजार मेगावॅट वीजनिर्मितीची तयारी ठेवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी 500 मॅगावॅट वीजनिर्मिती जादा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता महाजनको 8 हजार मॅगावॅट वीजनिर्मिती करून ती राज्याला देईल.
 
राज्यात दर दिवशी २ हजार ते २५०० मेगावॉटची तूट निर्माण झाली होती. ती दूर करण्यात सध्या विभाग सध्या यशस्वी झाला आहे. विभागाने २० लाख मे.टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर आवश्यकतेनुसार ४ लाख मे.टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिलेले आहेत. वीज खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विजेची तूट कमी होईल, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून २५ एप्रिलपर्यंत दिलासा