Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 15 March 2025
webdunia

सत्ता कुणाचीही असो, आम्ही फक्त बशा धुणारे झालोय - विजय वडेट्टीवार

सत्ता कुणाचीही असो, आम्ही फक्त बशा धुणारे झालोय - विजय वडेट्टीवार
, रविवार, 8 ऑगस्ट 2021 (09:57 IST)
"सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं? आम्ही फक्त बशा धुणारे झालोय. आम्हाला भजे दिले की, आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खातायेत ना. ज्यांच्यामुळे मंत्री झालो त्यांच्यासाठी खपायला शिकलं पाहिजे," असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.
 
औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसींच्या सत्तेतील वाट्याबाबत उपस्थितांसमोर आपली मतं मांडली
 
यावेळी वडेट्टीवारांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं.वडेट्टीवार म्हणाले, "पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजेत."
 
"भावा-भावांमद्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूज आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारका आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या," असं वडेट्टीवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसी आरक्षण बचावासाठी दुहेरी प्रयत्न सुरु : भुजबळ