शिवरायांच्या महाराष्ट्रात करोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनाशी लढा आपण सगळे मिळून देत आहोत. ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं असून महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा त्या जवानासारखाच आहे. यावेळी ठाकरे म्हणाले की आपण करोना विषाणूची गती रोखली आहे. मात्र त्याची साखळी तोडण्यात अजून यशस्वी झालेलो नाही म्हणून ही साखळी तोडून हे संकट संपवायचं आहे.
आजच्या घडीला १८ हजाराच्या पुढे करोना रुग्णांची संख्या गेली. मात्र सुमारे सव्वा तीन हजार लोक उपचारानंतर घरीही गेले आहेत. त्यामुळे प्रयत्न सगळे सुरु आहेत असंही त्यांनी म्हटले.