केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळताच नारायण राणे यांना दुसरा धक्का बसला आहे.नाशिक पोलिसांकडून राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान,आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.यावर आजच सुनावणीची शक्यता आहे.
राणे यांना अटक करणे हा हेतू नाही फक्त वक्तव्याची पुनरावृत्ती होऊ नये ही अपेक्षा. त्यांना नोटीस बाजावण्याची कारवाई झालेली आहे.त्यांनी बॉण्ड लिहून दिलेला आहे ते अपेक्षित होते.आमच्या केसमध्ये 2 तारखेला येण्याचे समन्स दिले आहेत.त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे,अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.ते म्हणाले अटकेच्या आदेशात बदल करण्यात आले आहेत आणि केवळ नोटीस बाजवण्यात आली आहे. भारताच्या संविधानात राष्ट्रपती आणि राज्यपाल सोडून कुणी व्यक्ती कितीही मोठा असेल त्याला अटक केली जाऊ शकते, मी रुल ऑफ लॉ फॉलो करतो,असे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणाले.