Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता शिक्षकांच्या नावासमोर टीआर पदवी लागणार !

school teacher
, शनिवार, 22 एप्रिल 2023 (08:50 IST)
जसं डॉक्टर, वकील, इंजिनियर आदींच्या नावाच्या बोर्डासमोर त्यांच्या पदव्या आहेत तसा आता शिक्षकांच्या नावासमोर टी. आर ही पदवी लावली जाणार आहे. तशी घोषणा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करण्यात येणार आहे तसा निर्णयही झाला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत . ते शिक्षकांकडून विविध कामे करून घेण्यासाठी पैसे मागत आहेत. जर शिक्षकांची अशी पिळवणूक होत असेल तर त्यांना वटणीवर आणले जाईल असेही त्यांनी सुचित केले. श्री म्हात्रे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी- दोडामार्ग या दोन तालुक्यात त्यांनी शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात बैठका घेतल्या. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार्यवाह रामचंद्र घावरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, भरत सराफदार ,श्री मोरे रमेश जाधव, चंद्रकांत पवार ,लक्ष्मण गवस, सुमेधा नाईक, श्री मापसेकर, अर्चना सावंत, सौ परब घावरे, माणगाव हायस्कूलचे श्री सावंत आदींनी आपल्या समस्या अडचणी स्पष्ट केल्या . यावेळी श्री म्हात्रे पुढे म्हणाले आपण आपल्या आमदार निधीतून यापुढे प्रत्येक शाळेत ई लर्निंग टीव्ही संच चांगल्या दर्जाचे देणार आहोत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते!-अजित पवार म्हणाले