Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता बोला, चक्क बाजार समितीच्या आवारातून सव्वा लाखाच्या तुरीची चोरी!

pulses
, मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (08:07 IST)
आतापर्यंत चोरटे किमती वस्तू चोरी करत असत. मात्र आता रट्यांनी आपला मोर्चा चक्क शेतकऱ्यांच्या शेतमालाकडे वळवला आहे. अहमदनगर बाजार समितीच्या आवारातुन सव्वा लाख रुपयांची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना नेवासा बाजार समितीच्या कुकाणा उपबाजाराच्या आवारात घडलीआहे. यात १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ४० तुरीच्या गोण्यांची चोरी केली आहे. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.याप्रकरणी आडते व्यावसायिक संतोष भागवत सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी, मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या कुकाणा उपबाजाराच्या आवारात असलेल्या दुकानातुन २० क्विंटल म्हणजेच ४० तुरीच्या भरलेल्या गोण्या चोरीस गेल्या आहेत. कुकाणा उपबाजाराच्या आवारात सुरक्षारक्षक नसल्याने चोऱ्या होण्याचे प्रकार वाढल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सोनवणे यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत आहेत.तोंडाला फडके बांधुन गोण्या चोरी करताना दिसत आहेत. या आवारातुन एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतमालाची चोरी होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं’; शरद पवारांना राष्ट्रवादीकडून खास शुभेच्छा