Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"राम कोण आहे?"... मृणाल जाधवच्या व्हिडिओमुळे उसळला संताप, आई-वडील ढसाढसा रडले

crime
महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये भगवान श्री राम यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणाव निर्माण झाला. एका तरुणीने सोशल मीडियावर कार चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला, या मध्ये तरुणीने भगवान श्रीराम बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. मृणाल जाधव असे या तरुणीचे नाव आहे. तरूणीने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपशब्द असलेले वक्तव्य करणारा व्हिडिओ  शेअर केला होता.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना, स्थानिक नागरिक आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाला.
मृणाल जाधव ही भाजपच्या बदलापूर पूर्व महिला शहराध्यक्ष प्रतिभा जाधव यांची कन्या आहे. तिचे वडील महेश जाधव हेही स्थानिक स्तरावर ओळखले जातात.
व्हिडिओमध्ये ती कार चालवताना स्वतःचा व्हिडिओ शूट करून प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह/शिवराळ भाषा वापरली असल्याचे सांगितले जाते.
 
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी  बदलापूर पूर्व भागात तणाव निर्माण झाला.जरंग दल आणि वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला ताब्यात घेतले. दरम्यान, रिक्षा संघटनांनी संप पुकारला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.शहरात निदर्शने झाली आणि मोठ्या संख्येने लोकांनी कारवाईची मागणी केली.
 
या घटनेनंतर आई वडिलांनी महेश जाधव आणि प्रतिभा जाधव हे ढसाढसा रडले आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना खेद व्यक्त केला. वडिलांनी "मुलगी लहान आहे, तिच्या कडून चूक झाली" असे म्हट्ल आहे.  
या प्रकरणी वर भाजपने कारवाई केली असून प्रतिभा जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपच्या महिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांना भाजपने बडतर्फ केले आहे. भाजपच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी तात्काळ आणि कायद्यानुसार चाकाशी करून कारवाई करण्यात यावी असे भाजपने स्पष्ट केलं आहे. 
या प्रकरणी चित्र वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तरुणीच्या या वक्तव्याला निंदनीय म्हटलं आहे. 
घटनेची माहिती मिळतातच बदलापुरातील रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त बंद पुकारला. प्रतिभा जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला.

पोलिस कारवाई: बदलापूर पोलिसांनी मृणाल जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीव्ही सिंधू ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाही!