Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फीच्या नादात 4 डॉक्टरांनी जीव गमावला

सेल्फीच्या नादात 4 डॉक्टरांनी जीव गमावला
इंदापूर : इंदापूर तालुक्यातल्या उजनी बॅक वॉटर परिसरात सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातले 4 डॉक्टरांवर नियतीनं घाला घातलाय. 10 डॉक्टर्स उजनी बॅकवॉटर परिसरात पर्यटनासाठी आले होते. होडीतून नदी पार करताना होडी बुडाली. स्थानिक ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे सहा जणांचे प्राण वाचले मात्र चौघांना जलसमाधी मिळाली. 
 
होडी नदीत बुडाल्यानं चौघांचा जीव गेला. एनडीआरएफच्या जवानांची वाट पाहत न बसता स्थानिक मच्छिमार आणि गावकर्‍यांनी शोधाशोध केली आणि सर्व मृतदेह बाहेर काढले. डॉ. सुभाष मांजरेकर, डॉ. अण्णा शिंदे, डॉ. चंद्रकांत उराडे आणि डॉ. महेश लवटे असे मृतकांची नावे आहेत.
 
सेल्फी काढण्याच्या नादात ह्या डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घातल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलंय. नदीतून प्रवास करताना बोटीतल्या एकाही व्यक्तीनं जॅकेट ट्युब किंवा इतर सुरक्षिततेची दक्षता न घेतल्यानं त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचं समोर आळंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

२६ किलो सोन्याची पालखी देवीला अर्पण