फोटो साभार -सोशल मीडिया ज्या वयात मंदिर,जप,देवाचे नामस्मरण करत घरात किंवा एखाद्या मंदिरात आपले मन रमवायच्या वयात कोल्हापूरच्या 76 वर्षाच्या आऊ आजींनीशिवछत्रपती राज्याभिषेक दिनी रायगड सर केला.
आऊबाई भाऊ पाटील असे या आजींचे नाव आहे. डोक्यावर कोल्हापुरी फेटा बांधून हातात काठी घेत आजी प्रत्येक पायरी चढताना हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असणारे प्रेम त्यांच्या प्रति असणारा आदर, भक्ती, आणि मुखाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ज्या उत्साहाने रायगड सर करत होत्या, त्यांच्या हा उत्साह, जोश, आनंद आजच्या तरुण पिढीला लाजवणारा होता. येणारे-जाणारे आपल्या मोबाईलमध्ये या तरुण आजींचे छायाचित्र घेत होते. त्यांचे एक एक पाऊल टाकत महाराजांसाठी घोषणा करत होते. त्यानं पाहून इतरांना देखील उत्साह आणि जोश येत होता.
आऊबाई पाटील यांनी 2014 -2015 साली दिंडनेर्लीच्या उपसरपंच म्हणून कार्य केले आहे. त्यांना शेतीची आवड असून या वयात देखील शेतात बैलाचे औत हाकतात.ओव्या, छत्रपती शिवाजी राजेंचे पोवाडे गातात.
त्यांनी आपल्या मुलाकडे रायगड जाण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या मुलांनी त्यांचा हा हट्ट पूर्ण केला. त्यांनी या आधी देखील तीन वेळा रायगड सर केले आहे. याच बरोबर त्यांनी प्रतापगड, सिंहगड, तोरणा, राजगड, सज्जनगड, केले सर केले आहे. त्यांनी घोडेस्वारी, उंट, सफारी, रेसिंग कार, फुटबॉल, क्रिकेट, आणि वॉटरबोटचा पर्यटनस्थळी आनंद घेतला आहे.त्यांच्या या वयात एवढा जोश पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.