Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर
, बुधवार, 26 मे 2021 (21:54 IST)
अहमदनगर  शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या अर्बन बॅकेच्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि 31 ऑगस्ट पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला आहे.रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन शाखांना होत असलेला तोटा पाहून नवीन शाखांना परवानगी देणे बंद केले.
परंतु नव्याने सुरू करण्यात आलेल्या 15 नवीन शाखा पैकी काही अपवाद वगळता बहुतांशी शाखा तोट्यात राहील्या व बँकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले.
ऑगस्ट 2019 मध्ये चेअरमन व संचालक मंडळाची हाकलपट्टी झाली व बँकेवर आलेले प्रशासकांनी तोट्यात असलेल्या शाखा बंद करणेचा निर्णय घेतला.
चाकण व सिन्नर शाखा काही महिनेपुर्वी बंद करण्यात आल्या. 2008 ते 2012 या कालावधीत तब्बल 15 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या व यातील दोन चार शाखांचा अपवाद वगळता सर्वच शाखा सुरूवातीपासून तोट्यात आहेत.
बँकांच्या वाढत्या शाखा व शाखांचे उदघाटन कार्यक्रमात राजकीय स्वार्था बरोबर आर्थिक लाभ करून घेणे या फायद्यांसाठी नविन शाखा उघडण्यात आल्या. बँकेला व्यवसाय किती मिळेल ,
बँकेचा फायदा होईल की नुकसान याचा कुठलाही विचार न करता या नवीन शाखा उघडणेचा धडाका लावला होता. आता तोट्यात असलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय प्रशासक घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अधिकाऱ्याकडे सापडले एवढे घबाड; ACB करणार कसून चौकशी