नाशिकमध्ये फोन -पे द्वारे व्यापाऱ्याची केली दीड लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ढवळेश्वर (नाशिक:ता. मालेगाव) येथील प्रशांत खैरनार (वय ३१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या व्यापाऱ्याची दुकानावर खरेदीसाठी आलेल्या अनोळखी ग्राहकाने मोठ्या हातचलाखीने क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी मोबाईल घेऊन स्वत:च्याच फोन पे वर दीड लाख रुपये टाकून घेत फसवणूक करण्याचा आगळावेगळा प्रकार घडला. या प्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैरनार यांचे लखमापूर येथे साई ॲग्रो सर्व्हीसेस हे ड्रीप इरीगेशन व पीव्हीसी पाईप विक्रीचे दुकान आहे. संबंधित ग्राहकाने यांच्याकडून पीव्हीसी पाईप खरेदी करावयाचे आहेत, असे सांगून त्यांचा मोबाईल घेत फसवणूक केली. त्यांचा मोबाईल क्रमांकावर फोन पे वर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्युआर कोड वापरुन स्कॅन करण्यास सांगून त्यांचा मित्र साक्षीदार प्रमोद सोनवणे यांचे मोबाईल क्रमांक ९२८४९०९०२१ वरील फोन पे मोबाईलवरुन दीड लाख रुपये ऑनलाइन त्याच्या फोन पे वर ट्रान्स्फर करुन फसवणूक केली.