महाराष्ट्रातील जळगाव येथे एका केमिकल कारखान्याला लागलेल्या आगीत 20 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. त्यात एकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात अजूनही अनेक कामगार अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागण्यापूर्वी मोठा स्फोट झाला होता. यानंतर संपूर्ण कारखान्यातून ज्वाळा उठू लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेक्टर D मधील मोरया केमिकल कंपनीमध्ये बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत 20 पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कर्मचार्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झाले असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.