लातूर (Latur)जिल्ह्यातिल औसा येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या गावात एक अशी व्यक्ती आहे ज्याला आतापर्यंत एक दोन वेळा नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेळ सापाने चावा घेतलाय. कदाचित या गोष्टीवर सामान्यांचा विश्वास बसणार नाही, पण खरी घटना आहे. लातुरच्या औसा शहरातील रहिवासी 45 वर्षीय अनिल तुकाराम गायकवाड शेतमजुरी करत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. अनिलला गेल्या 10 ते 15 वर्षांत किमान 500 वेळा साप चावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनिलला अनेकवेळा आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले आहे. इतक्या वेळा साप चावूनही हा अनिल आयुष्याच्या या शर्यतीत जोमाने टिकून आहे.
डॉ.सच्चिदानंद रणदिवे यांनी आतापर्यंत किमान 150 वेळा अनिल गायकवाड यांच्यावर उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल यांनाच साप का चावतो याच मोठं आश्चर्य वाटतं. एकाच व्यक्तीला अनेकवेळा सर्पदंश होतो, ही खरोखरच आश्चर्यकारक घटना आहे.