Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

पाऊण किलो गांजा जप्त, तरुणाला अटक

One pound
, गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (08:19 IST)
बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 712 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील बावधन येथे  केली.केशव त्रिंबक काळे (वय 21, रा. उत्तमनगर, बावधान) आणि अक्षय साळुंके  अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकातील कर्मचारी प्रसाद राजण्णा जंगीलवाड यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याच्याकडे गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून काळे याच्याकडून 712 ग्रॅम वजनाचा गांजा, बुलेट, मोबाइल आणि सॅक असा एकूण दोन लाख 13 हजार 150 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील 183 अँमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा निर्णयाला कडाडून विरोध : वंदना चव्हाण