Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

ऑनलाइन गेम्स तरुणाईच्या जीवावर, नाशिकरोड येथील एकाची आत्महत्या

Online Games Suicide of a youth at Nashik Roadऑनलाइन गेम्स तरुणाईच्या जीवावर
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (21:57 IST)
सध्या लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच गेमिंग अँप, ऑनलाईन व्हिडिओ गेमने पछाडले आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही तरुणांमध्ये या गेमचे वेड कमी होताना दिसत नाही. नाशिकरोड येथील एका तरुणाचा ब्ल्यू व्हेल गेमने जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
 
तुषार जाधव असे या तरुणाचे नाव आहे. नाशिक रोडमधील गायकवाड मळ्यात तुषार जाधव राहत होतो. गेल्या अनेक दिवसांपासून तुषार हा ब्ल्यू व्हेल नावाचा ऑनलाईन गेम खेळात असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान काल तुषार हा एकटाच घरी होता. यावेळीही तो ब्ल्यू व्हेल गेम खेळत होता. काही वेळानंतर तुषार यान धारदार शस्राने आपल्या मनगटावर वार केले. त्यानंतर फिनाईलचे सेवन करत घरातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घरी आल्यानंतर पालकांच्या लक्षात आला.
 
मुक्तिधाम परिसरात गायकवाड मळ्यात जाधव कुटुंब राहते. जाधव कुटुंबीयास तुषार हा मुलगा होता. त्याला पहिल्यापासून मोबाइलवर ऑनलाइन ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याची सवय होती. त्यामुळे तो एकटा असतानाही हा गेम खेळत असे. बुधवारच्या (दि. २९) दिवशी घरी एकटा असताना गेम खेळण्यास सुरुवात केली. या दरम्यान तुषारने आपल्या दोन्ही मनगटांवर धारधार वस्तूने जखमा करून घेतल्या. तसेच फिनाईलचे सेवन केल्यानंतर घरातच गळफास घेत आत्महत्या केली.
 
जाधव कुटुंबीय घरी तेव्हा तेव्हा घराचे दोन्ही दरवाजे बंद होते. त्यांनी घराची बेल वाजवली अन्‌ दरवाजाही जोरजोराने ठोठावला. मात्र आतमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. दम्यान प्रमोद जाधव यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला असता त्यांना धक्काच बसला. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ऑनलाइन ब्ल्यू व्हेल खेळाच्या आहारी गेल्याने तुषार याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटु’च्या कुलगुरुपदी नियुक्ती