गेल्या २८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनावर भाष्य करताना रोखठोक मत माडलं आहे. त्यांनी सांगितलं की, “एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”.
सयाजी शिंदे पिंपरी-चिंचवडमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी दाक्षिणत्या चित्रपटातील एक डायलॉग ऐकवा. एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला असं ते म्हणाले.