Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील 14 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील 14 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
, शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (09:49 IST)
राज्यात अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यात काही जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 3 ते 4 दिवस देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भा आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई उपनगरात पावसाची हजेरी लागणार असून ठाणे, नवी मुंबई, रायगड, कल्याण, पालघर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. समुद्राच्या किनारी जाणाऱ्यांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
नाशिक, जळगाव, नंदुरबार, जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर परभणी, छत्रपतीसम्भाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

राज्यातील विदर्भात अमरावती, नागपूर, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यांत हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकोल्यात 10 वर्षाच्या मुलीचा एक वर्षापासून लैंगिक छळ, आरोपी नातेवाईकाला पोलिसांनी केली अटक