1 जून- गडदेवता शिर्काई पूजन, छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, गंगासागर पूजन, संध्याकाळी पारंपरिक गोंधळ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम
2 जून -
सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा
सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा
सकाळी 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा
सकाळी 11 वाजता शिवपालखी सोहळा
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरेस राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच श्रीमंत शाहूराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तिथीप्रमाणे 2 जूनला पहाटेपासूनच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे चांदीच्या पालखीचे आज पूजन करण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील होन देखील यावेळी राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान वापरले जाणार आहेत. गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत.
तारखेप्रमाणे 6 जून रोजी सोहळा
तर 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार असून संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. 2007 पासून सुरू झालेल्या या सोहळ्याला आता व्यापक स्वरुप प्राप्त झालं असून 6 जून रोजी रायगडवर दोन ते अडीच लाख शिवभक्त जमा होतात.
मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागानं हे आदेश काढलेत. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या आदेशाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. 1,2 जून आणि 5, 6 जून या दिवशी अवजड वाहनांना बंदी असेल. 16 टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेच्या जड, अवजड वाहनं, ट्रक, मल्टी एक्सल ट्रेलर यांना वाहतूकीसाठी बंदी घातली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. तर राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांची वाहतूक कोंडीने गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतलाय.
Edited by: Ratnadeep Ranshoor