Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल
पंढरपूर- सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरापुरात दाखल झाले आहेत. आज माघवारी असून विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भावूक आतूर झाले आहेत, मात्र श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.
 
माघ वारीनिमित्त विठ्ठल- रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांती भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला आहे. परिणामी रस्त्यावरून ये-जा करणेही क‍ठीण होत आहे. चौक बोळ, गल्लीच्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याकडे येणार्‍या गल्लीतील रस्त्यावर लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत.
 
सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत. संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे. मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चौटाला प्रकरणी गुरूवारी निर्णय