Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार

विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार
पंढरपूर- आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आसा ठेवून राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येतात. या भाविकांना आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार आहे.
महानैवेद्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. आषाढी यात्रेचा सोहळा संपेपर्यंत म्हणजे 13 जुलैपर्यंत विठूमाऊली चोबीस तास भाविकांच्या दर्शनासाठी उभी राहणार आहे. विठूरायाच्या काकड्यापासून शेजारती पर्यंतचे सर्व राजोपचार बंद होणार असून सकाळी नैवेद्य, सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार देवाले केले जाणार आहेत.
 
व्हीआपी दर्शन बंद
विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत येणार्‍या भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आषाढीच्या तोंडावर व्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र यामुळे तथाकथित व्हीआयपी मंडळीचा सामान्य भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
 
आमदार, खासदार आणि मंत्रालयातून चिठ्या घेऊन येणारे हे व्हीआयपी झटपय दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शन रांगेत भाविकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागते. यामुळेच 25 जूनपासून सर्वच प्रकारच्या व्हीआयपींसाठी असलेले झटपट दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रेसींग रूममध्ये लक्ष देऊ नये: विनोद राय