साखरवाडी, कोडोली ता. पन्हाळा येथे मामाचे निधन झाल्याच्या नैराश्यातून भाचीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर पंख्याच्या हुकास ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. श्रध्दा धर्मेंद्र कांबळे (वय २४) असे तिचे नाव आहे. तिच्या निधनामुळे साखरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून या बाबतची वर्दी श्रीकांत कांबळे याने कोडोली पोलीसात दिली आहे. या बाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, श्रद्धा ही एकुली एक मुलगी असून हिचा मॅकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा झाला असून ती पुणे येथे कामाला आहे. तिचा मामा संचित कांबळे (रा. उदगाव ता. शिरोळ ) याच्या निधनानंतर ती नैराश्यात गेली होती. या कारणाने तीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याच्या हुकास ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
घरातील दुपारी दोनच्या सुमारास तीला जेवणासाठी बोलाविणेस गेले असता ही घटना उघडकीस आल्या नंतर या बाबतची वर्दी कोडोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. पुढील तपास पोलीस नाईक नांगरे करीत आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor