Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकज आणि समीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पंकज आणि समीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
, शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:56 IST)

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापे टाकले. मुंबईतील एक प्लॉट फसवणुकीने मिळवून त्यावर अवैधपणे व्यावसायिक इमारत बांधल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना पंकज आणि समीर यांनी इतरांशी संगनमत करून फसवणुकीने बनावट सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे मुंबईच्या ओशिवरा भागात म्हाडाकडून एक प्लॉट मिळवला. या निवासी जागेवर व्यावसायिक इमारत उभारण्यात आली, असा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने पंकज आणि समीर यांच्यासह 17 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवस्थान जमिनीसाठी आता 'पश्‍चिम महाराष्ट्र पॅटर्न'