परभणी शहरात वसमत रोडवर एका ढाब्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा केल्याची बातमी येत आहे. मी पोलीस आहे जेवणाचे बिलाचे पैसे मी देणार नाही असे म्हणत धिंगाणा केला आहे. ओंकार मंगनाळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला लाजवणारे कृत्य हे या पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचे म्हटले जात आहे.
परभणीच्या वसमत रोड वरील रोहन केराब काळे यांचा ढाबा आहे. संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी ओंकार मंगनाळे हे दोघांच्या समवेत या ढाब्यावर आले आणि जेवण केल्यानंतर जेवणाचे बिल मागितल्यावर ढाब्याच्या मालकाला मी पोलीस कर्मचारी आहे, तुला माहित नाही का, मी पैसे देणार नाही ,तुला बघून घेईन अशी धमकी दिली आणि दारू पिऊन धिंगाणा करत जेवणाचे बिलाचे पैसे न देता तसेच निघून गेले.
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पोलीस कर्मचारी ओंकार मंगनाळे यांचा विरोधात ढाब्या चालकाला धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. पोलिसांकडून दमदाटी करण्याच्या या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.